रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दारूड्याने पळवली चक्क एसटी बस 

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दारूड्याने पळवली चक्क एसटी बस 

निलंगा (जि. लातुर)/ प्रतिनिधी - गावाकडे जाण्यासाठी रात्री उशिरा एसटी बस नसल्याने बस स्थानकातून एसटीच पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजानी बस स्थानकात ही धक्कादायक घटना घडली आहे. 

रात्री उशिरा गावात जाण्यासाठी एसटी नसल्यानं दारूच्या नशेत शेळगी गावातल्या तरुणांनी एसटीच पळवून नेली. एसटी पळवताना लाईटच्या दोन खांबांना देखील जोराची धडक बसल्यानं विजेच्या तारा तुटून खाली पडल्या. शिवाय विजेचा खांब देखील कोसळला आहे. पहाटेच्या सुमारास बस स्थानकात झोपलेल्या बसच्या चालक आणि वाहकाला एसटी जाग्यावर नसल्याचं समजताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले. एसटी कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनुसार औराद पोलिसांनी शोध घेतल्यानंतर शेळगी गावात एसटी बस सापडली. तरुणांनी एसटी बस पळवून नेताना झालेल्या अपघातामुळे एसटीचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. मात्र एसटी खात्याकडून कोणत्याही प्रकारची तक्रार पोलीस ठाण्यात नसल्याने दारुड्यांविरुद्ध गुन्ह्यांची नोंद झालेली नाही.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा