परळीत औद्योगिक परिसरात भीषण आग; लाखोंचे सामान जळुन खाक

परळीत औद्योगिक परिसरात भीषण आग; लाखोंचे सामान जळुन खाक

परळी/ प्रतिनिधी - शहरातील औद्योगिक परिसरातील एका कुलरच्या फॅक्टरीस लागली अचानक भीषण आग लागल्याची घटना आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लागली आहे. या आगीत मोठी वित्तहानी झाली असुन सुदैवाने जिवित हानी झाली नाही.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, औद्योगिक परिसरात सुनिल सोळंके यांचे कुलर व इतर इलेक्ट्रॉनीक साहित्याचे गोदाम आहे. या गोदामाला आज सायंकाळी अचानक भीषण आग लागली असुन या आगीत कुलर व इतर साहित्य जळुन खाक झाले असुन लाखोचे नुकसान झाले आहे. दरम्यान नगर परिषद व थर्मलच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करुन आग अटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जात आहे. या आगीत लाखोंचे नुकसान झाले असून ही आग कोणत्या कारणाने लागली आहे हे अद्याप समजु शकले नाही.

हि आग इतकी भिषण होती कि, आग इतरत्र फैलावण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. आगीला नियंत्रित करण्यासाठी अग्निशामक बंबा बरोबर स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा