मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडये सह फ्रंट वर्कर यांनी घेतला बूस्टर डोस

औरंगाबाद/प्रतिनिधी
कोरोना ओमीक्रोन व्हायरस चा वाढता प्रभाव बघता केंद्र सरकारने 10 जानेवारी पासून देशात आरोग्य व विविध विभागातील फ्रंट लाईन वर्कर आणि 60 पेक्षा जास्त  गँभीर आजार व जेष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देण्याचे आदेशित केले.
यानुसार आज मंगळवारी 11 जानेवारी रोजी मनपा मुख्याल्यात मनपा मधील अधिकारी व फ्रंट वर्कर याचा साठी प्रिकोशन बूस्टर कोरोना लसीचा डोसच नियोजन करण्यात आलं होतं.' या वेळी मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडये यांनी पहिला डोस घेउन या लसीकरण ची सुरवात केली ,या वेळी मनपा अतिरिक्त आयुक्त बी बी नेमाने ,रवींद्र निकम,बी एस नाईकवाडे ,डॉ शेख शाहिद ,संजय नंदन ,एस कुलकर्णी सह मनपा मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तिसरा बूस्टर डोस घेतला,लस घेतल्या नंतर नखांवर मार्क करून निशाणी केली जात होती.
       या लसीकरण साठी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पारस मंडलेचा त्याच्या आरोग्य विभागातील डॉ़ आरोग्य सेविका यांनी या साठी विशेष नियोजन केले होते. या बूस्टर प्रिकोशन लसीकरण मोहिमेत जवळपास 40 महानगरपालिका मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लसीचा डोस घेतला ,10 जानेवारी ते 11 जानेवारी प्रेयत 200 हजार वर  जेष्ठ नागरिक व फ्रंट वर्कर यांनी बूस्टर डोस घेतला.
यावेळी मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडये यांनी नागरिकांनी बूस्टर व इतर लसीकरण जास्तीत जास्त लोकांनी करून घ्यावे असे आवाहन केले. ,या शिवाय जेष्ठ व वयोवृद्ध नागरिकांनी घरी जाऊन बूस्टर  डोस देण्याचं पण नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा