सकारात्मक... जिल्ह्यात आज फक्त 54 कोरोना रुग्णांची वाढ

सकारात्मक... जिल्ह्यात आज फक्त 54 कोरोना रुग्णांची वाढ

औरंगाबाद/ प्रतिनिधी - औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 54 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या 38 हजार 356 झाली आहे. अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मनपाकडून 30 आणि ग्रामीण भागात 06 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (17) 

गंगापूर (5), कासोद सिल्लोड (1), बजाज नगर (2), फुलंब्री (1), वीरगाव वैजापूर (1), उक्कडगाव वैजापूर (1), फुलेवाडी रोड वैजापूर (1), वैजापूर (1), श्रीकृष्ण नगर नगरी देवळाई (1). औरंगाबाद (1), सिल्लोड (1), पिंपळगाव (1) 

मनपा (07) 

निरंजन हौ.सो.टिळक नगर(1), एन 9 श्री कृष्णा नगर सिडको (1), एन 2 सिडको (1), एन 9 शिवाजी नगर (1), जाधववाडी(1), बजाज हॉस्पीटल परिसर (1), गुलमंडी (1)

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

आज घाटीत खुलताबाद येथील 43 वर्षीय पुरूष, मिसारवाडीतील 54 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात बालाजी नगरातील 58 वर्षीय स्त्री, वानखेडे नगरातील 50 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा