नांदेड - पनवेल विशेष रेल्वेस एक महिन्याची मुदतवाढ

वेळेतही केला बदल

नांदेड - पनवेल विशेष रेल्वेस एक महिन्याची मुदतवाढ

नांदेड / प्रतिनिधी - नांदेड-पनवेल-नांदेड या उत्सव विशेष रेल्वेस एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली असून या गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेने एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.तसेच या रेल्वेतून आरक्षणाशिवाय प्रवास करता येणार नसल्याचेही दमरेने म्हटले आहे. 

नांदेड ते पनवेल (क्र.०७६१४) या विशेष रेल्वेला दिनांक ३० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर अशी मुदत वाढ देण्यात आली असून ही विशेष रेल्वे ३० नोव्हेंबरपासून नव्या वेळेनुसार धावणार असल्याचे म्हटले आहे. नांदेड रेल्वे स्थानकावरून सायंकाळी साडेपाच वाजता सुटुन पूर्णा येथे सहा वाजता, परभणीत ६ वाजून 32 मिनिटांनी, परळीत रात्री साडेआठ वाजता, तर पुणे येथे दुसर्‍या दिवशी सकाळी ६ वाजून 20 मिनिटांनी तर तेथून पुढे पनवले येथे सकाळी नऊच्या सुमारास पोचणार आहे.

पनवेल ते नांदेड (क्र.०७६१३) या विशेष रेल्वेस दिनांक १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदत वाढ देण्यात आली असून हि गाडी दिनांक १ डिसेंबरपासून बदलेल्या वेळेनुसार धावणार आहे. पनवेल रेल्वे स्थानकावरून दुपारी चार वाजता सुटून, पुणे येथे साडेसात वाजता, परळीत दुसर्‍या दिवशी सकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी, परभणीत ६ वाजून ५२ मिनिटांनी, पूर्णेत साडेसात वाजता, नांदेड येते पावणे नऊ वाजता पोचेल, असे दक्षिण मध्य रेल्वेने म्हटले आहे. 

या गाडीला दोन्ही दिशेने पुर्णा जंक्शन, परभणी जंक्शन, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातुर रोड जंक्शन, लातुर, उस्मानाबाद, कुर्डुवाडी जंक्शन, दौंड जंक्शन, पुणे जंक्शन, चिंचवड, तळेगाव, लोणावळा या स्थानकांवर थांबेल.

प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करताना भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी कोवीड १९ संसर्गा संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे बंधनकारक असेल असे दमरेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा औरंगाबाद हैदराबाद आणि अमरावती तिरूपती या उत्सव विशेष गाड्यांस मुदतवाढ 

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा