लातुरच्या महापौरांना कोरोनाची लागण

खबरदारीचा उपाय म्हणुन होम आयसोलेशन

लातुरच्या महापौरांना कोरोनाची लागण

लातुर/ प्रतिनिधी - लातुरचे महापौर विक्रांत गोजमगुडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: गोजमगुडे यांनी आपल्या फेसबुकवरुन ही माहिती दिली आहे. दोन दिवसांपासुन सर्दीचा त्रास होत असल्याने त्यांनी कोव्हिड १९ ची तपासणी केली. त्यानंतर आज अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. गोजमगुडे यांची तब्येत चांगली असून खबरदारीचा उपाय म्हणून होम आयसोलेशन मध्ये रहावे लागणार आहे.
महापौर गोजमगुडेंनी फेसबुकच्या पोस्ट मध्ये म्हटले की, "लातूरमध्ये कोरोना चा शिरकाव झाल्यापासून आघाडीवर पण पूर्ण काळजी घेऊनच वावरत होतो. आज कोरोना विरोधातील लढाई अंतिम टप्प्यात आली आहे, असं वाटत असताना कोरोनाने गाठले आहे. कोरोना चे संकट काही अंशी नियंत्रणात आले आहे पण ते अजूनही पूर्णपणे गेलेले नाही. आपण सर्वजण पूर्वीसारखेच आपापल्या कामकाजात भले व्यस्त झालेले असू पण मास्क वापरणे, सॅनिटायझर ने वारंवार हात धुणे आणि फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करणे या त्रिसूत्रीचे पालन आपण सर्वांनी करायलाच हवे असे माझे सर्व लातूरकरांना नम्र आवाहन आहे." आपला थोडासाही निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो. लक्षात ठेवा कोरोना अजूनही संपलेला नाही. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारी म्हणून स्वतःची कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन महापौर गोजमगुडे यांनी केले आहे.
"आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि आशिर्वादाने लवकरच कोरोना मुक्त होऊन आपल्या सेवेत पुन्हा नव्या जोमाने रुजू होईल." असेही महापौरांनी म्हटले आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा