राज्यमंत्री संजय बनसोडेंचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

राज्यमंत्री संजय बनसोडेंचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

लातूर/ प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उदगीर येथे असलेल्या त्यांच्या पुतळ्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, भूकंप पुनर्वसन, पाणीपुरवठा व स्वच्छता व रोजगार हमी योजना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

राज्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे मुंबई येथिल कार्यक्रम साजरा करुन उदगीर येथे दाखल झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. सध्या मुंबई येथील इंदू मिल मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या उभारणीला वेग आला असून १४ एप्रिल २०२३ रोजी लोकार्पण केले जाणार आहे. असे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

       यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर पाटील,पंचायत समितीचे सभापती शिवाजी मुळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कल्याण पाटील, नागसेन बोधी, मंजूरखं पठाण गजानन सताळकर देविदास कांबळे, एस डी सोनकांबळे, ढवळे,बलाडे, महेश पाटोदकर, धनाजी बनसोडे, माधव कल्लुरकर, दिपाली आवटे, उर्मिला वाघमारे, भरत शिंदे, आदी उपस्थित होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा