केंद्र शासनाने नविन कृषी कायदा रद्द करावा

महाविकास आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

केंद्र शासनाने नविन कृषी कायदा रद्द करावा

अहमदपूर/ प्रतिनिधी - नविन कृषी कायदा रद्द करावा शेतमालाला हमी भाव मिळण्यासाठी कायदेशीर तरतूद करावी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार कार्यवाही करावी या प्रमुख मागणीचे निवेदन अहमदपुरच्या तहसीलदारांना आज दि. ७ डिसेंबर रोजी महाविकास आघाडी च्या वतीने देण्यात आले.

या निवेदनावर आमदार बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवानंदजी हेंगणे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती चंद्रकांतजी मद्दे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख बालाजी रेङ्ङी, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष विकास जी महाजन, शिवसेनेचे शहराध्यक्ष भारतभाऊ सांगविकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशिष तोगरे, फेरोज शेख, अशोक सोनकांबळे, शैलेश जाधव, व्यंकट वंगे, किरण बारमाळे, जावेद बागवान, मोहम्मद नाजिमभाई यांच्यासह चंद्रशेखर भालेराव यांच्या स्वाक्षरी आहेत.

केंद्र शासनाचा नविन कृषी कायदा रद्द करावा यासाठी दिनांक ८ डिसेंबर २०२० रोजी च्या भारत बंदला महाविकास आघाडीच्या वतीने जाही पाठिंबा देण्यात आला आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा