सेलु येथे गुरुचरित्र कथामृत उत्साहात सुरू 

कोरोनाचे नियम पाळून कथामृत सुरू

सेलु येथे गुरुचरित्र कथामृत उत्साहात सुरू 

सेलु/ प्रतिनिधी - सेलु येथील काबरा परिवाराच्या वतीने गुरुचरित्र कथामृत या कौटुंबिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कौटुंबिक कार्यक्रमात काबरा परिवारातील सर्व सदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. या कथामृतेची सुरुवात दि. १२ फेब्रुवारी रोजी झाली होती तर सांगता दि. १८ फेब्रुवारी पर्यंत करण्यात आले असून या आठ दिवशी दुपारी २ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही कथा सुरू असते. हे गुरुचरित्र कथामृत ह.भ.प. श्रीराम महाराज गुंजकर हे या कथेचे प्रवक्ता आहेत. 

या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्रीनिवास काबरा यांनी सांगितले की, आमचे वडील स्व. नंदलालजी काबरा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच आमच्या आईच्या इच्छेने या कौटुंबिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व कुटुंबातील सदस्यांच्या भेटीगाठी देखील होत आहेत. तसेच सध्या जगभरात धुमाकूळ घालत असणाऱ्या कोरोना महामारीच्या पार्श्र्वभूमीवर सयकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन या कौटुंबिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. एकंदरीतच या कौटुंबिक कार्यक्रमाच्या आयोजनामुळे काबरा परिवारात सध्या आनंदाचे वातावरण आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा