बर्थडे बॉय 'हिटमॅन' शर्माचे 'हे' विक्रम मोडणे अशक्य

बर्थडे बॉय 'हिटमॅन' शर्माचे 'हे' विक्रम मोडणे अशक्य

औरंगाबाद/ भरत साबु - भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माचा आज ३० एप्रिल रोजी ३४वा वाढदिवस आहे. रोहित शर्मा सध्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करत आहे. रोहितचे चाहते त्याला ‘हिटमॅन’ म्हणतात. रोहित शर्माचा विवाह रीतिका सचदेहसोबत २०१५ मध्ये झाला होता. त्यांना आता एक गोंडस मुलगीदेखील आहे. 

धडाकेबाज क्रिकेटपटू रोहित शर्मा याचे काही विक्रम मोडणे केवळ अशक्य आहे. पहिला विक्रम आहे एकदिवसीय सामन्यातील द्विशतकाचा. रोहितने एकदिवसीय सामन्यात तब्बल तीन द्विशतक झळकावली आहे. हा विक्रम मोडणे जवळपास अशक्यच आहे. दुसरा विक्रम एकदिवसीय सामन्यात सर्वोच्च धावसंख्येचा, रोहितने आपले दुसरे द्विशतक हे श्रीलंकेविरुद्ध कोलकाता येथे झळकावले होते. यावेळी त्याने तब्बल ३३ चौकार आणि ९ षटकारांची आतषबाजी करत २६४ धावांची खेळी केली होती. हा विक्रम मोडणे अशक्य आहे. कारण एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणाऱ्या इतर खेळाडूंना २४० धावाचाही टप्पा ओलांडता आला नाही.

रोहितचा तिसरा विक्रम हा एकाच विश्वचषकात ५ शतके झळकावण्याचा आहे. क्रिकेट तज्ञांच्या मते हा विक्रमही अबाधीत मानला जात आहे. २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत रोहितने दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंका या संघाविरुद्ध शतके करत स्पर्धेत ६४८ धावा केल्या होत्या. तर अतंरराष्ट्रीय टी-२० सामन्यात सर्वाधिक चार शतक करण्याचा विक्रमही त्याच्या नावे आहे. शेवटचा विक्रम हा आयपीएल स्पर्धेतील विजेतेपदाचा आहे. रोहित शर्माने आतापर्यंत आयपीएलमध्ये ६ अंतिम सामने खेळला आहे. यापैकी सर्व सामने जिंकला आहे. यातील एक सामना डेक्कन चार्जर्सकडुन खेळला तर इतर सामने हे मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. यात कर्णधार म्हणून रोहितने आयपीएलमध्ये पाच वेळा विजेतेपदाला गवसणी घातली आहे. हा विक्रम मोडणे देखील अशक्य आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा