आमदार बाबासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर 

आमदार बाबासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर 

अहमदपूर/ प्रतिनिधी - अहमदपूर चाकुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांना प्रतिसाद देत आज दि. ५ डिसेंबर रोजी लातुर जिल्हा कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन ॲंड सोशल फोरम ऑफ महाराष्ट्र राज्य या पुर्ण वेळ खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांच्या वतीने रक्तदान करण्यात आले. 

यावेळी कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन ॲंड सोशल फोरम ऑफ महाराष्ट्र राज्य या पुर्ण वेळ खासगी कोचिंग क्लासेस संचालक शिक्षक संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. एस. के. पठाण, जिल्हाध्यक्ष प्रा. संतोष रोडगे, प्रा. मकरंद जोशी, प्रा. दिपक बेले, प्रा. रामदास काटापल्ले, प्रा. नितीन कोंडापुरे, प्रा. सय्यद रहीम, प्रा. नागनाथ गादगे, प्रा. अभय निलंगेकर, प्रा. जाधव, प्रा. भिसे, प्रा. जगताप, प्रा. कल्पले यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा