रशियन लष्कराच विमान कोसळल

रशियन लष्करी विमानाचा अपघात झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. रशियन लष्करी विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या अपघातात विमानातून प्रवास करणाऱ्या लष्करातील सर्व 15 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची दु:खद माहिती समोर आली आहे.

रशियन लष्कराचे IL-76 विमान जमिनीच्या दिशेने उतरताना त्याच्या एका इंजिनला आग लागल्याने हा अपघात झाला आणि त्यानंतर विमान कोसळलं. या विमान अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला असून फुटेजमध्ये क्रॅश साइटवरून काळ्या धुराचे लोट उठताना दिसत आहेत.

विमानातील सर्व 15 कर्मचारी जागीच ठार

रशियन मीडियाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, लष्करी मालवाहू विमानाला आग लागली आणि मॉस्कोच्या ईशान्येकडील इव्हानोव्हो प्रदेशात अपघात झाला. मंगळवारी ही घटना घडली. रशियन लष्करी मालवाहू IL-76 विमान जमिनीच्या दिशेने उतरत असताना त्याच्या एका इंजिनला आग लागली आणि यानंतर विमान कोसळलं, अशी माहिती द मॉस्को टाईम्सने दिली आहे. या विमान अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान, युक्रेनियन प्रिझनर्स ऑफ वॉरसह रशियन लष्करी विमान क्रॅश झाल्यानंतर एक महिन्यानंतर ही आणखी एक दुर्घटना घडली आहे.

विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळलं

रशियन मीडिया रिपोर्टनुसार, या दुर्घटनेत विमानातून प्रवास करणाऱ्या 15 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रशियन लष्कराच्या मालवाहू विमानाला अपघात झाला आहे. विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळलं. त्याच्या एका इंजिनला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

रशियन सोशल मीडिया या विमान अपघातासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक विमान जळत्या इंजिनसह खाली कोसळताना दिसत आहे. विमान खाली कोसळत असताना धुराचे प्रचंड लोट आकाशात उठताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा