सहा लाखाच्या चोरीचा गुन्हा आठ तासात उघड

सहा लाखाच्या चोरीचा गुन्हा आठ तासात उघड

औरंगाबाद/प्रतिनिधी - भर दुपारी एका व्यापार्याची लूट करून सहा लाख रुपयांचे दागिने लंपास करणाऱ्या तीन जणाला गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या आठ तासात जेरबंद केले आहे.

व्यापारी अशोक शंकर पाटील यांचे गळयातील सोन्याच्या चेन 1) रचना तुळशिराम निंभोरे, रा. भाग्योदय नगर, चाटे स्कुल जवळ, सातारा परिसर, औरंगाबाद 2) रोहित विठ्ठल बोर्डे, रा. फुले नगर, गल्ली नंबर 03, उस्मानपुरा, औरंगाबाद यांने त्याचा मित्र व या तीघांनी मिळुन जबरी चोरी करुन घेवून गेले होते.  रोहित बोर्ड हा त्याचे राहते घरी गल्ली नंबर 03, उस्मानपुरा, औरंगाबाद येथे आहे अशी माहीती मिळाली त्यावरुन सदरची माहीती वरीष्ट्रांना देवून सपोनि मनोज शिंदे यांनी त्यांचे पथकासह बातमीच्या ठिकाणी जावुन रोहीत विठ्ठल बोर्डे यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली त्यास विश्वासात घेवून विचारपुस असता सदर गुन्हयातील फिर्यादी अशोक शंकर पाटील, रा. समर्थनगर, ओरंगाबाद यांचे गळ्यातील सोने जबरीने चोरुन नेण्या करीता रचना निभोर हिने तीचा मित्र नदीम खॉन नजीर खॉन रा शम्स नगर, शहानुरवाडी याच्या मार्फतीने सुपारी दिली होती व काम झाल्यास मिळालेल्या सोन्यापैकी 40% रचना निभोरे, 20% नदीम खॉन व 40% मला अशी वाटणी ठरली. त्यावरुन दि 16/03/2022 रोजी 2.30 वाजेच्या सुमारास रचना निंभोरे ही अशोक पाटील यांचे मोहटाई रियल इस्टेट ऑफीस स्कायलाईन पार्क बिल्डींग, शॉप नं1, समर्थनगर, औरंगाबाद येथे अशोक पाटील यांना भेटण्याकरीता गेली. मला ठरल्या प्रमाणे फोन केला असता मी व माझा मित्र विवेक अनिल गंगावणे, वय 19 वर्ष, रा. फुले नगर, उस्मानपुरा असे मिळुन सदर ठिकाणी गेलो व अशोक पाटील यास मारहान करुन त्याचे गळयातील सोन्याच्या चैन जबरीने ओढुन नेल्या असे सांगुन त्याने त्याचे राहत्या घराचे कपाटातून 1) 1लाख 3हजार 650/- रुपये किमतीची 20.73 ग्रॅम वजनाची कडयाची डिझाईन असलेली तुटलेली सोन्याची चैन, 2) 1,13,600/- रुपये किमतीची 22.72 ग्रॅम वजनाची फुला फुलाचा गोफ असलेल सोन्याची तुटलेली चैन, 3) 2.17,800/- रुपये किंमतीची 43.56 ग्रॅम वजनाची चौकोणी कडयाची डिझाईन असलेली सोन्याची तुटलेली चैन, 4) 1,14,150/- रुपये किंमतीची 22.83 ग्रॅम वजनाची गोफची डिझाईन असलेली सोन्याची तुटलेली चैन असा एकुण 5,49,200/- रुपये किंमतीचा एकुण 109.84 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे जप्त केले आहे.

तसेच त्यानंतर गुन्हयातील रोहित विठ्ठल बोर्डे, रा. फुले नगर, गल्ली नंबर 03, उस्मानपुरा, औरंगाबाद , विवेक अनिल गंगावणे वय १९ वर्ष रा. ग.नं. ३, उस्मानपुरा, औरंगाबाद, नदीम खान नजीर खान रा. शम्स कॉलनी, शहानुरवाडी, औरंगाबाद यांना मुद्येमालासह पोलीस ठाणे क्रांतीचौक येथे येथे मुद्देमालासह हजर करुन जबरी चोरीचा गुन्हा आठ तासाचे आत उघडकीस आणला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता,  पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय)  अपर्णा गिते, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ।) उज्वला वनकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शाना खाली सपोनि मनोज शिंदे, सफौ.विठ्ठल जवखेडे, सफी. सतीश जाधव, सफी.नजीखा पटाण, पोह. संतोष सोनवणे, पोह. चंद्रकांत गवळी, पोह. सुधाकर मिसाळ, पोना. भगवान शिलोटे, पोना. अवलिंग होनराव, पोकॉ. नितीन धुळे, पोकां. संदीप बीडकर, पोकों. विशाल पाटील, पोकॉ. विलास मुठे, पोकों. नितीन देशमुख, मपोकों. गीता ढाकणे, पोना. ज्ञानेश्वर पवार, सफी. रमेश गायकवाड यांच्या पथकाने केली.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा