बलात्कार करून फोटो आणि व्हिडिओ आईला पाठवले

बलात्कार करून फोटो आणि व्हिडिओ  आईला पाठवले

संभाजीनगर /प्रतिनिधी -  लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे एवढेच नाही तर तिचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ मोबाईलच्या कॅमेऱ्यात काढून ते फोटो आरोपीनं तिच्या आईला पाठवले आहेत.
या घटनेनं खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पीडितेनं सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीनुसार पोलिसांनी बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. दत्तात्रय शेजुळ असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका वीस वर्षीय तरुणीवर आरोपीने लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आरोपीनं तरुणीचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओचं चित्रिकरण करून ते तिच्या आईला पाठवले. या प्रकारानं खळबळ उडाली आहे.

आरोपी दत्तात्रय शेजुळ याच्यासोबत पीडित मुलीची वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. दत्तात्रयने या तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिचे फोटो आणि व्हिडीओ मोबाईलमध्ये काढले. यानंतर त्याने हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर वारंवार अत्याचार केला. मात्र पीडितेनं विरोध केल्यानंतर त्याने आपल्या जवळचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या आईला व्हाट्सअ‍ॅपवर पाठवले. तसेच ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. अखेर या त्रासाला कंटाळून पीडितेनं सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीनुसार आरोपीविरोधात बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा