समर्पित आयोग नागरिकांच्या भेटीसाठी औरंगाबादमध्ये

समर्पित आयोग नागरिकांच्या भेटीसाठी औरंगाबादमध्ये

औरंगाबाद/प्रतिनिधी - जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायती आणि शहरातील महानगर पलिका, नगर पालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हीजे एनटी) आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे राज्य शासनाने समर्पित आयोग घटित केला आहे. हा आयोग औरंगाबाद विभागात 22 मे रोजी सकाळी 09.30 ते 11.30 या वेळेत विभागीय आयुक्त कार्यालयात भेट देणार आहे.
राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटनांची  निवेदने स्वीकारण्यासाठी आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे. या आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात नावाची नोंदणी 22.05.2022 पूर्वी करावी, असे आयोगातर्फे निवेदन करण्यात आले आहे. यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा, असेही आयोगाने कळविले आहे. 

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा