जोगेश्वरी ग्राम विकास अधिकारी यांची मनमानी

जोगेश्वरी ग्राम विकास अधिकारी यांची मनमानी

औरंगाबाद/प्रतिनिधी - गंगापुर तालुक्यातील श्रीमंत समजल्या जाणाऱ्या जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी भीमराव भालेराव हे गावातील सर्वसामान्य नागरिकांना गावातील झालेली विकास कामे आणि त्यासाठी खर्च झालेला निधी अशी माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली होती मात्र ही माहिती गेल्या दीड महिन्यापासून अनिल मैद यांना देण्यास टाळाटाळ करत असल्याची माहिती समोर आली आहे.

जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत गेल्या पाच वर्षात केलेले विविध विकास कामे  आणि त्यासाठी  खर्च करण्यात आलेला निधी याची माहिती  अनिल महंत यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज करून मागितली आहे  मात्र गेल्या दीड महिन्यापासून ही माहिती देण्यास ग्राम विकास अधिकारी भालेराव टाळाटाळ करत  आहेत  असा आरोप अनिल मैद यांनी केला आहे ग्रामपंचायतीमार्फत केलेल्या विकास कामात मोठा घोटाळा झाल्याची शक्यता महिन्यांनी व्यक्त केले आहे विकास विकास काम आणि त्यासाठी खर्च करण्यात आलेला निधी यामध्ये मोठा घोटाळा असल्याची शक्यता असल्यामुळे ग्राम विकास अधिकारी हे माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे माहिती देण्याऐवजी ग्राम विकास अधिकारी हे तत्कालीन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना खोटी माहिती सांगून अर्जदार आवर दबाव निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे विकास कामाने त्यावर झालेला निधी खर्च याची माहिती दिल्याने जर काही अडचण होत नसेल तर ग्रामविकास अधिकारी माहिती देण्यास का टाळाटाळ करत आहेत असा आरोप त्यांनी पब्लिक डिमांड च्या प्रतिनिधीशी बोलताना केला ग्राम विकास अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे तसेच मला जर माहिती मिळाली नाही तर मी जनआंदोलन उभे करून शेवटपर्यंत लढा देणार असल्याच्या भावना मैद यांनी व्यक्त केले आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा