विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक समस्या सोडवण्याबाबत अभाविपचे प्र-कुलगुरुंना निवेदन 

विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक समस्या सोडवण्याबाबत अभाविपचे प्र-कुलगुरुंना निवेदन 

औरंगाबाद/ प्रतिनिधी - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद औरंगाबादच्या वतीने विविध मागण्यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा.डॉ.श्याम शिरसाठ यांना आज दि. २ डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले.

अभाविपने निवेदनात केलेल्या मागण्या - 
 १) विविध व्यवसायिक शिक्षणासाठी बारावी नंतर MHT-सीईटी परीक्षा घेतली जाते.  या परीक्षेचा निकाल २८ नोव्हेंबर रोजी घोषित करण्यात आला. या परीक्षेत अनेक विद्यार्थी व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरले नाहीत तर सदर विद्यार्थी विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयात पारंपारिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छितात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये व त्यांना इतर अभ्यासक्रमास प्रवेश घेता यावा यासाठी विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ ऑनलाईन/ ऑफलाईन प्रवेशाचे नियोजन करावे. या विद्यार्थ्यांना विद्यापीठ संलग्न महाविद्यालयात प्रवेश देण्यात यावा.
      
 २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा ९ ऑक्टोंबर ते ३१ ऑक्टोंबर या कालावधीत संपन्न झाल्या आहेत. परीक्षा झाल्यापासून ७ दिवसात निकाल लावण्यात येतील असे आपण सांगितले होते,मात्र परीक्षा होऊन ३१दिवस झाले आहे तरीही आपण अद्यापही निकाल लावले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तत्काळ परीक्षांचे निकाल लावण्यात यावेत. 

३) एम.जी. एम.जी. वाय. पाथ्रिकर महाविद्यालयातील BCA तृतीय वर्षातील Java Server Pages (JSP) या विषयातील विद्यार्थ्यांच्या निकालात तांत्रिक चुकीमुळे सर्वच विद्यार्थी नापास दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या विद्यार्थ्यांचा निकाल मूल्यांकन करून पुन्हा घोषित करण्यात यावा असे मागील निवेदनात नमूद केले होते परंतु अद्यापही या विद्यार्थ्यांचे निकाल लागलेले नाहीत.

४) डायरेक्ट द्वितीय वर्ष प्रवेशित असणाऱ्या मागील तीन वर्षांपासून च्या अभियांत्रिकी च्या विद्यार्थ्यांचे डिग्री प्रमाणपत्र अजूनही वितरित झालेले नाहीत.युनिव्हर्सिटी मध्ये मागील एक वर्षापासून हे विद्यार्थी नेहमी जाऊन चौकशी करीत आहेत, परंतु विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या या समस्यांना घेऊन टाळाटाळ करीत आहे. यामध्ये विध्यार्थ्यांना मोठया प्रमाणावर जॉब्स सोडावे लागत आहेत व कुठलेही फॉर्म भरता येत नाहीत.  या विद्यार्थ्यांना डिग्री प्रमाणपत्र  तात्काळ वाटप करण्यात यावे.


                   वरील सर्व विषय हे अत्यंत महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून विद्यापीठ प्रशासन ने योग्य तो निर्णय घेऊन शैक्षणिक समस्या लवकरात लवकर लक्ष देऊन सोडवाव्यात अन्यथा अभाविप तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेेळी देण्यातत आला. यावेळी प्रदेश सहमंत्री अंकिताताई पवार, महानगरमंत्री निकेतन कोठारी, सहमंत्री उमाकांत पांचाळ, ऋषीकेश केकान, दिपक टोणपे सह विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा