व्हॉइस ऑफ मीडियाकडून पत्रकारांना दहा लाखाचा विमा

व्हॉइस ऑफ मीडियाकडून  पत्रकारांना   दहा लाखाचा विमा

वाळूज महानगर  /प्रतिनिधी - देश आणि विदेशामध्ये जवळपास 54 देशात कार्यरत असलेली पत्रकारांची सघटना व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने  वाळूज  महानगरातील पत्रकारांना दहा लाखाचा विमा वितरण  रविवार( दि.24) रोजी हॉटेल ड्रीम लाईनच्या सभागृहात करण्यात आले.

 लढा पत्रकारांचा पत्रकारांच्या हक्कासाठी... या ब्रीद वाक्याला समोर घेत तसेच पंचसूत्री ध्येय घेऊन  संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली  हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश रेंगे पाटील, जिल्हा महासचिव अमित फुटाणे, संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते शिवाजी बनकर, शहराध्यक्ष रवी माताडे, जिल्हा कोषाध्यक्ष  संदीप चिखले, जिल्हा उपाध्यक्ष महेश डागा, राजेभाऊ मोगल, वाळूजमहानगर अध्यक्ष किशोर बोचरे, ज्येष्ठ पत्रकार शेख मेहमूद, आर के भराड, संतोष बारगळ, प्रकाश गाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय काळे यानी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी बोडखे यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश रेंगे पाटील,  अमित फुटाणे, रवी माताडे, आदींनी व्हॉइस ऑफ  मीडिया या देशव्यापी संघटनेचे ध्येयधोरण, लढा पत्रकारांचा पत्रकारांच्या हक्कासाठी, आरोग्य,औद्योगिक, आदी क्षेत्रामध्ये व्हाईस ऑफ मीडियाच्या सुरू असलेल्या कामाबद्दल प्रकाश टाकला. या प्रसंगी व्हाईस ऑफ  मीडिया वाळुज शाखेचे  संतोष बारगळ आर के भराड, संदीप चिखले, रवी गाडेकर, आदींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात आर के भराड, शेख मेहमूद, संतोष बारगळ,संदीप लोखंडे, संजय काळे, अशोक साठे,निलेश भारती, राहुल मुळे, रवी गाडेकर, अनिकेत घोडके, शिवाजी गायकवाड, हुरखान  पठाण, विठ्ठल मस्के, रवी कुलकर्णी, रमेश हातोळे, भरत गायकवाड, आदींना दहा लाखाच्या विमाचे वितरण करण्यात आले. संघटनेचे कार्य पाहून प्रेरीत झालेले पत्रकार माधव घोरबांड, संतोष बोटवे, राजू जंगले, डीपी वाघ, भरत थटवले, संदीप साळे, यानी व्हाईस ऑफ मिडीया संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले. राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला तर आभार वाळूजमहानगर अध्यक्ष किशोर बोचरे यांनी मानले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा