उदयगिरीतील डॉ. रमेश मुलगे यांना 'कर्नाटका राज्योत्सव रत्न पुरस्कार' प्राप्त

उदयगिरीतील डॉ. रमेश मुलगे यांना 'कर्नाटका राज्योत्सव रत्न पुरस्कार' प्राप्त

उदगीर/ प्रतिनिधी - येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील कन्नड विभागप्रमुख तथा संशोधक मार्गदर्शक डॉ. रमेश मुलगे यांना विश्व कन्नडिगा संस्था कर्नाटकच्या वतीने दिला जाणारा 'कर्नाटका राज्योत्सव रत्न पुरस्कार' प्राप्त झाला आहे. 

कर्नाटक - महाराष्ट्र सीमा भागात कन्नड विषयाच्या भरीव साहित्यनिर्मितीबाबत तसेच कन्नड भाषा प्रचार व सेवेबाबत डॉ. मुलगे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. आजपर्यंत डॉ. मुलगे यांनी कन्नड भाषेत २४ पुस्तकांचे लिखाण केले आहे. डॉ. मुलगे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर, म्हैसूर विद्यापीठ, म्हैसूर, संगमेश्वर महाविद्यालय (स्वायत्त विद्यापीठ) या विविध ठिकाणी अभ्यास मंडळावर विषयतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. संशोधक मार्गदर्शक म्हणूनही डॉक्टर मुलगे काम करत आहेत. बिदर - कन्नडा साहित्यसंमेलन अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. यापूर्वीही डॉ. मुलगे यांना कन्नडा कंटीरवा, हैदराबाद व गुलबर्गा येथील संस्कार पुरस्कार यासारखे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

            त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहरराव पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा